सतीश निकुंभ : सातपूर- एका बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक होत असल्याचा दावा करीत आहेत, कारण त्यांनी विविध उद्योगांना अनुदानित सवलती जाहीर केल्या आहेत. परंतु दुसरीकडे, सन २०२१ पासून सुरू असलेल्या ‘मुख्यमंत्री सहाय्यता रोजगार योजना (सिएमजीपी)’ अंतर्गत मिळणारे अनुदान त्रयस्थ तपासणी अभावी रखडल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे नोंदणीकृत उद्योजक संबंधित जिल्हा उद्योग केंद्राच्या वारंवार चकरा मारत आहेत.