Revenue Department Corruption
sakal
नामपूर: सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असलेली महसूल व पोलिस खाती म्हणजे लाचखोरीचे अड्डेच बनल्याचे मावळत्या २०२५ वर्षातील आकडेवारीतून उघड झाले आहे. दरवर्षी लाचखोरीत अव्वल राहणाऱ्या पोलिस खात्यालाही मागे टाकत महसूल खात्याने यंदा थेट पहिला क्रमांक पटकावला असून, या विभागाची प्रतिमा चिखलात रुतली आहे.