दिवाळीच्या गर्दीसाठी मालेगाव आगाराच्या ४३ जादा बसफेऱ्या

दिवाळीच्या गर्दीसाठी मालेगाव आगाराच्या ४३ जादा बसफेऱ्या
Published on: 
पान तीन ------------------- 12226 मालेगाव शहर: येथील बसस्थानकात प्रवाशांची झालेली गर्दी. दिवाळीनिमित्ताने मालेगाव आगारातून ४३ जादा बसफेऱ्या सकाळ वृत्तसेवा मालेगाव शहर, ता. ६ : दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मालेगाव एसटी आगाराने बसफेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. नियमित बसफेऱ्यांव्यतिरिक्त ४३ जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. दिवाळी हंगाम संपेपर्यंत या फेऱ्या सुरू राहणार आहेत. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार अन्य मार्गांवरही जादा बस सोडण्यात येणार असल्याची माहिती आगारप्रमुख विजय पाटील यांनी दिली. दिवाळी सणासाठी गावी जाणारे नागरिक आणि भाऊबिजेसाठी माहेरी जाणाऱ्या महिलांची बसस्थानकावर गर्दी होत आहे. ही गर्दी लक्षात घेऊन आगाराने अतिरिक्त बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. पुणे मार्गावर नियमित पाच, पाचोरा मार्गावर दहा, तर नाशिक मार्गावर दर अर्ध्या तासाने बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नाशिकसाठी दररोज सुमारे २८ बसफेऱ्या सुरू आहेत. ४३ जादा बस सोडल्या जात आहेत.शालेय बसफेऱ्या बंद झाल्याने उपलब्ध झालेल्या बसेसचा वापर अन्य मार्गांवरील वाहतुकीसाठी करण्यात येत आहे. प्रवाशांना सुरक्षित व सुखकर प्रवास सेवा देण्यासाठी आगारातील कर्मचारी प्रयत्नशील आहेत. वाढीव बसफेऱ्या दिवाळी हंगाम संपेपर्यंत कायम ठेवण्यात येणार असून, काही नवीन फेऱ्या कायमस्वरूपी सुरू करण्याचाही विचार असल्याचे सांगितले. प्रवाशांसाठी लांब पल्ल्याच्या मार्गांवर ऑनलाइन तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आगारातील आरक्षण केंद्र दोन सत्रांत सुरू असून, त्यामुळे प्रवाशांना आगाऊ तिकीट आरक्षित करणे शक्य होत आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवाळी हंगामातील प्रस्तावित दहा टक्के हंगामी भाडेवाढ टळली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दोन रुपयांत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. यासह शासनाच्या अन्य सवलतींचाही प्रवाशांना लाभ घेता येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.