मुख्य, पान १
--------------
NSK26H31984
नाशिक : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० चा प्रारंभ करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शेजारी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, ग्रामविकास व पंचायतराजमंत्री जयकुमार गोरे, अन्न आणि औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ व मान्यवर.
------
NSK26H31986
नाशिक : सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
---------
NSK26H31981
नाशिक : पुरस्कार सोहळ्यात बोलताना पोपटराव पवार.
----------
NSK26H31982
नाशिक : सोहळ्याप्रसंगी एकपात्री नाटक सादर करताना अभिनेता संदीप पाठक.
----------
NSK26H31979
नाशिक : उपस्थितांची तपासणी करीत असलेले पोलिस.
---------------
३६-४
गावागावांत जलसंधारणाची कामे घ्यावीत
--------
मुख्यमंत्र्यांचे आवाहन : दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना, आवश्यक निधी देणार, पंचायतराज अभियानाचा प्रारंभ
--------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ११ : राज्यावर यंदा दुष्काळाचे गंभीर संकट आहे. या संकटाला संधीत रूपांतरित करताना गावागावांमध्ये जलसंधारणची कामे हाती घ्यावीत. ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, अधिकारी व यंत्रणेने एकत्र येऊन पाझर तलाव आणि बंधाऱ्यांमधील गाळ उपसा करावा. भविष्याच्या दृष्टीने पाण्याच्या थेंबा-थेबांचे नियोजन करतानाच जलसंधारणासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात याव्यात, राज्य सरकार त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
---------------
पंचायतराज अभियान-२.० मध्ये दुष्काळाशी दोन हात या संकल्पनेवर आधारित कामांना प्राधान्य द्यावे, पाणी उपलब्ध असल्यास प्रथम पिण्याला द्यावे, त्या व्यतिरिक्त असल्यास रब्बी हंगामाचे नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी राजभरातून आलेल्या सरपंचांना केल्या.
राज्याच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागातर्फे पंचवटीतील यूथ फेस्टिवल मैदानावर रविवारी (ता. ११) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ चे पुरस्कार वितरण, तसेच पंचायतराज २.० अभियानाचा प्रारंभ सोहळा झाला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अभियानाचा प्रारंभ झाला. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास व पंचायतराजमंत्री जयकुमार गोरे, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव एकनाथ डवले, ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह जिल्ह्यातील आमदार व मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की राज्यात जलयुक्त शिवार योजनेतून गावांमधील संघटन शक्ती दिसून आली. गावे एकत्रित आल्यास काय आविष्कार करू शकतात, याचे उत्तम उदाहरण जलयुक्त शिवार योजना होती. त्याच धर्तीवर हाती घेतलेल्या समृद्ध पंचायतराज अभियानाला गावागावांमधून चांगला प्रतिसाद लाभतो आहे. पण, यंदा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे गावांनी पाण्याच्या थेंबाथेंबाची बचत करावी. खरीप हातचा गेला असून, रब्बीचे नियोजन करताना सर्वप्रथम माणसे व जनावरे जगली पाहिजेत, ही भावना लक्षात घेत पाण्याचे नियोजन करावे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याला प्राधान्य देताना पाण्याची बचत झाल्यास ते रब्बीसाठी उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. गावपातळीवर गाळ काढणे, जलसंधारण, बंधाऱ्यांची दुरुस्ती व पाणी अडविण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
मंत्री जयकुमार गोरे यांनी पंचायतराज अभियानाच्या यशाबद्दल माहिती देताना राज्यातील पाच हजार ६४४ गावांनी त्यात सहभाग घेतला. या सहभागातून पाणंद रस्ते, स्वच्छतागृह, शाळा दुरुस्ती, व्यायामशाळा यांसारखी कामे पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, गावांमध्ये दोन हजार ७०६ अंतर्गत रस्त्यांचे जाळे निर्माण केल्याची माहिती गोरे यांनी दिली. डॉ. पुलकुंडवार यांनी प्रास्ताविक केले. या सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागांतील सरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे पदाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.
---
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी
राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ घोषित करताना तेथे १२ प्रकारच्या सुविधा लागू करण्यात आल्या आहेत. मात्र, उर्वरित तालुक्यांतील गावांची परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे निकष बाजूला ठेवत सर्व गावे व तालुक्यांना मदत केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, राज्यातील १८ लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमाफीची मदत दिल्याचे त्यांनी सांगितले.
------------
२०-२ चौकट करणे
गोवशांची विक्री करू नका : मुख्यमंत्री
राज्यातील दुष्काळाची परिस्थिती भयानक आहे. या परिस्थितीत माणसे व जनावरांना जगविण्याचे आव्हान उभे ठाकले. सरकार सर्वतोपरी उपाययोजना राबवत आहे. पशुधन सांभाळणे हेही एक आव्हान आहे. अशा स्थितीत शेतकरी पशुधन विकण्याच्या स्थितीत असतील, ते त्यांनी विकू नये, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. जनावरांसाठी आवश्यक चारा व पाण्यासाठी सरकार मदत करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ‘जी रामजी’ योजनेच्या माध्यमातून विविध योजनांचे अभिसरण करताना जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येतील. या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतमजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यासाठी सरकार पावले उचलत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
------------