सरकारच्या फक्त घोषणा, प्रत्यक्षात मदत नाही

सरकारच्या फक्त घोषणा, प्रत्यक्षात मदत नाही
Published on: 
पान-३-५ ------- २३३७३ मनेगाव (ता. सिन्नर) ः येथे दुष्काळी स्थितीची पाहणी करताना आमदार आदित्य ठाकरे. समवेत अंबादास दानवे, राजाभाऊ वाजे, दत्ता गायकवाड, जयंत दिंडे, निवृत्ती जाधव आदी. ---------------- दुष्काळप्रश्नी विशेष अधिवेशन बोलवा --------------- आदित्य ठाकरे ः सिन्नर तालुक्यात दुष्काळी भागात पाहणी -------------- सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता.३ ः राज्यातील २६५ तालुके दुष्काळी जाहीर झाले. दिवाळीत पाच हजाराची मदत देण्याचे फडणवीस सरकारने जाहीर केले. परंतु, प्रत्यक्षात काहीच नाही. सरकार केवळ घोषणा करण्यात व्यस्त असल्याची टिका शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली. दुष्काळप्रश्नी विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणीही त्यांनी केली. मनेगाव येथे दुष्काळी पाहणी दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते. शेतकऱ्यांनी ठाकरे यांनी संवाद साधून दुष्काळाची माहिती घेतली. पक्षनेते आमदार अंबादास दानवे, खासदार राजाभाऊ वाजे, दत्ता गायकवाड, जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री. ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. खरिपाची सर्व पिके वाया गेली असून पिण्यासाठी पाणी नाही, चाऱ्याचा प्रश्न भेडसावत असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. सरकारकडून अद्याप कोणतीही मदत मिळाली नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. श्री. ठाकरे म्हणाले,‘ सरकारकडून शेतकऱ्यांना केवळ आश्वासने दिली जात असल्याचे सांगितले. तीन ते चार जिल्ह्यात फिरलो असून कोठेही मदत मिळालेली नाही. दुष्काळी स्थितीत तीन ते चार महिन्यात लगेचच उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी विशेष अधिवेशनाची मागणी करत आहोत. एल नीनोचे संकट दोन-तीन महिन्याचा विषय नसून दोन वर्षापर्यंत आहे. काही ठि काणी तर थंडी पडणार नसल्याचा अंदाज आहे. अशा अवस्थेत वातावरण बदलावर, शेतकऱ्यांच्या मदतीवर, उपाययोजना राबविण्यासाठी चर्चा व्हायला हवी, त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे. गतवर्षी अतिवृष्टीत ३२ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर झाली. परंतु, ही मदत अजूनही काही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. मग हा पैसा गेला कुठे? असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. मदतीची केवळ घोषणा करायची आणि सोडून द्यायचे हे योग्य नसल्याचे ठाकरे म्हणाले. मागच्या वर्षीची मदतही पोहोचली नाही, कर्जमुक्तीही नाही आणि आता दिवाळीची मदत पोहोचलेली नाही. १६-१ भाजपचे घाणेरडे राजकारण खासदार वाजे यांना कुंभमेळा ध्वजारोहण कार्यक्रमात अपमानास्पद वागणूक दिल्याच्या विषयावर ठाकरे यांनी खरा धर्म लोकांची मदत करणे, अन्यायाविरुद्ध लढणे असल्याचे सांगितले. म्हणूनच आज आम्ही लोकांत आहोत. भाजप घाणेरड्या राजकारणात व्यस्त असेल तर त्यांना तेथेच राहू द्या असा टोलाही त्यांनी हाणला. --------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.