येवला- कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे. आधुनिक लिंक हाफमन बुश डब्यांमध्ये रूपांतर केले आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा येवल्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील या मार्गावर छोट्या स्टेशनवरून बसणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुकर झाला आहे.