Why were hotel licenses suspended in Nashik?
esakal
जुने नाशिक : राज्यातील नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभर विशेष तपासणी मोहीम सुरू केली (Nashik hotel inspection news) आहे. या मोहिमेंतर्गत नाशिक विभागाने बुधवार (ता. १) आणि गुरुवार (ता. २) या दोन दिवसांत २० हॉटेले व खाद्य आस्थापनांची तपासणी केली. नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने नऊ आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले, तर चार विनापरवाना आस्थापनांना व्यवसाय तातडीने बंद ठेवण्याचे लेखी आदेश देण्यात आले.