नाशिक- ऊर्जा क्षेत्रातील संशोधन व सहकार्यासंदर्भात राज्य शासनाने कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार केला आहे. विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यामुळे ऊर्जा क्षेत्रातील संशोधन, नवकल्पनांना गती मिळणार आहे.