chhagan bhujbal security
sakal
नाशिक - मराठा आरक्षणप्रश्नी अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेनंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला वाटा देण्यास स्पष्ट विरोध दर्शविल्यानंतर त्यांच्या फार्महाऊसवर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच, गस्ती पथकांकडून दिवसरात्र कडेकोट बंदोबस्त ठेवला जात आहे.