Grape Exports: द्राक्ष निर्यातीला तीन वर्षांत उतरती कळा ;हवामानातील बदल, उत्पादन खर्च आणि बाजारपेठेतील स्पर्धेचे आव्हान

Maharashtra Grape Exports, Grape Export Decline, Nashik Farmers या संदर्भातील आकडेवारीनुसार, २०२३-२४ मध्ये निर्यातीसाठी ३.३८ लाख टन द्राक्षांना फाइटोसॅनिटरी प्रमाणपत्रे देण्यात आली होती.
Maharashtra grape exporters face declining certified export volumes amid rising costs, climate challenges and global competition.

Maharashtra grape exporters face declining certified export volumes amid rising costs, climate challenges and global competition.

esakal

Updated on: 

लासलगाव : महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असलेल्या द्राक्ष निर्यातीला गेल्या तीन वर्षांत उतरती कळा लागल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. २०२३-२४ मध्ये निर्यातीसाठी तीन लाख ३८ हजार २५६ टन द्राक्षांना फाइटोसॅनिटरी प्रमाणपत्रे (पीएससी) देण्यात आली होती. २०२५-२६ मध्ये हे प्रमाण दोन लाख ४९ हजार ५३५ मेट्रिक टनांवर आले. त्यामुळे तीन वर्षांत प्रमाणित द्राक्ष निर्यातीत सुमारे २६ टक्क्यांची घट झाली आहे.

प्लँट क्वारंटाइन विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२३-२४ मध्ये २१ हजार २३३ पीएससी जारी करण्यात आली होती. २०२४-२५ मध्ये ही संख्या १७ हजार ७७, तर २०२५-२६ मध्ये १४ हजार ३२८ वर आली. प्रमाणपत्रांची घटती संख्या निर्यात क्षेत्रासमोरील आव्हाने अधोरेखित करते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com