Latest Crime News | महाराष्ट्र GSTकडून बोगस बिलासंदर्भात एकावर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Nashik Crime News : महाराष्ट्र GSTकडून बोगस बिलासंदर्भात एकावर कारवाई

नाशिक : वस्तूंच्या प्रत्यक्ष व्यवहाराशिवाय बनावट कंपन्यांकडून ३७.२८ कोटी रूपयांची खोटी बिले घेऊन ६.७० कोटी रुपयांची वजावट प्राप्त करून घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे. करदात्याने महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम २०१७ च्या तरतूदीचे उल्लंघन करत वस्तूंची प्रत्यक्ष खरेदी न करता किंवा खोटी बिले स्वीकारून महसूल बुडविल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. (Maharashtra GST takes action against one in connection with bogus bill Nashik Latest Crime News)

साधारणत: या करचोरीची व्याप्ती ही ५० ते ५५ कोटी असून त्या संदर्भात तपास सुरू आहे. या प्रकरणी अस्तित्व मेटल्सचे मालक व करदाते संशयित सुनील अमृतलाल तुलसानी तपासात सहकार्य करत नसल्यामुळे व व्यवहाराची माहिती देत नसल्यामूळे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाच्या नाशिक कार्यालयातील अन्वेशन शाखेमार्फत करचुकवेगिरीसाठी शुक्रवारी अटक करण्यात आली.

त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. डी. जोशी यांच्या समोर हजर केले असता, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागातर्फे विषेश सरकारी वकील ॲड. शशिकांत सुदामराव दळवी यांनी न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. आरोपीच्या वकिलांनी जामिन मिळावा यासाठी अर्ज केला असता प्रकरणाची गंभीरता व तपासामध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून त्यास जामिन देण्यास ॲड. दळवी यांनी विरोध केला. न्यायालयाने आरोपीस १४ दिवसांपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

हेही वाचा: Nashik News : होमगार्डना मिळणार 3 महिने तुरुंगात काम; महाराष्ट्रातल्या 252 जणांना तूर्तास लाभ

खोटी बिले देऊन अथवा घेऊन शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडविल्याप्रकरणी मे. अस्तित्व मेटल्सच्या तपासणी दरम्यान मालक सुनील अमृतलाल तुलसानी यांनी हवाला करदात्यांकडून करवजावटीचा दावा केला. प्रत्यक्षात खोटी बिले देऊन बनावट करवजावटीचा पुरवठा केला.

विशेष मोहिमेंतर्गत अटकेची कार्यवाही अपर आयुक्त सुभाष उमाजी एंगडे यांच्या मोर्गदर्शनाखाली सहआयुक्त हरिश्चंद्र हिरामण गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली करउपायुक्त चेतन डोके, सहाय्यक आयुक्त योगेंद्र पाटील, संतोष सुर्यवंशी व डॉ. धर्मनाथ रोटे या प्रकरणात तपास करीत आहे.

हेही वाचा: Nashik News : सिडकोत द बर्निंग कंटेनर; सुदैवाने जीवितहानी टळली