Highway Accident: महामार्गांवरील भीषण अपघातांना बसणार वेसण; अकराशे पोलिसांची २४ तास गस्त, नाशिकसह २५ जिल्ह्यांतील यंत्रणा सक्रिय

Maharashtra Deploys 1100 Police To Prevent Highway Accidents: भीषण अपघात रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; महामार्गांवर २४ तास पोलिसांचा वॉच
Nashik Highway Safety 1100 Police Personnel To Patrol Roads 24 Hours As Maharashtra Acts Against Fatal Accidents

Nashik Highway Safety 1100 Police Personnel To Patrol Roads 24 Hours As Maharashtra Acts Against Fatal Accidents

sakal

Updated on: 

नाशिक : राज्यातील समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर सतत होणारे भीषण अपघात, गाड्यांचा अतिवेग, धोकादायक पद्धतीने मार्गिका बदलणे आणि चालकांचा निष्काळजीपणा रोखण्यासाठी तसेच महामार्गावरील आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी राज्य शासनाने पाऊल उचलले आहे. महामार्ग सुरक्षा पथकातील (एचएसपी) सुमारे अकराशे अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुढील सहा महिन्यांसाठी मुदतवाढ मंजूर केली असून या निर्णयामुळे २५ हून अधिक जिल्ह्यांतील महामार्गांवर २४ तास खडा पहारा कायम राहणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com