शिरपूर : खो-खो निवड चाचणी बातमी

शिरपूर : खो-खो  निवड चाचणी बातमी
Published on: 
खो-खो स्‍पर्धेची शुक्रवारी निवड चाचणी शिरपूर ः महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व अहिल्यानगर जिल्हा खो-खो असोसिएशनच्या वतीने २०२६-२०२७ या वर्षाची ६२ वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जिल्हा पुरुष व महिला खो-खो संघाची अजिंक्य पद व निवड चाचणी २० नोव्हेंबरला सकाळी दहाला येथील आर. सी. पटेल संकुलाच्‍या मुख्‍य प्रशासकीय इमारतीच्‍या मैदानावर होणार आहे. चाचणीतून निवडलेला संघ राज्य अजिंक्यपद स्पर्धेत धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधित्‍व करणार आहे. संघ निवड समितीमध्‍ये गुरुदत्त चव्हाण, हेमंत भदाणे व गौरव सपकाळे यांचा समावेश आहे. सहभागी इच्‍छुक संघास अधिकृत प्रवेश अर्ज, संलग्नता व प्रवेश फी, आधारकार्ड, जन्मदाखला, दहावी आणि बारावीचे बोर्ड प्रमाणपत्र जमा करणे अनिवार्य आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त संलग्न संघ, क्रीडा मंडळ, शाळा- महाविद्यालय व खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, अधिक माहितीसाठी प्रा. हेमंत भदाणे, प्रा. करण शिंदे, सागर माळी यांच्‍याशी संपर्क साधावा, असे आवाहन पंढरीनाथ बडगुजर, अनिल संचेती यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.