नामपूर (जि.नाशिक): देशभरातील विद्यार्थ्यांचे पोषण आणि आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी तब्बल नऊ हजार कोटी रुपयांच्या खर्चातून राबविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहार योजनेत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना विषबाधा होऊ नये, यासाठी नवीन मानक कार्यपद्धती (एसओपी) जाहीर करण्यात आली. आता शाळांमध्ये भोजन वाटण्याआधी मुख्याध्यापक, शिक्षक किंवा पालकांनी अन्न चव घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.