नाशिक- कुंडमाळ (जि. पुणे) येथे लोखंडी पूल कोसळून झालेल्या अपघातात चार पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभरातील जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. पावसाळी पर्यटन स्थळांवर सरसकट बंदी न घालत, पर्यटकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक काळजी घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत.