नाशिक: गृह विभागाकडून महाराष्ट्र पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा घोळ अद्यापही सुरूच आहे. त्यातच, राज्यातील ५० सहायक आयुक्तांच्या (एसीपी) बदल्यांचे आदेश नुकतेच जारी केले. परंतु, या बदल्यांमध्ये नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील रिक्त तीन जागांसाठी नवीन सहायक आयुक्तांची आवश्यकता असताना एकही नियुक्ती करण्यात आलेली नाही. दरम्यान, सहायक आयुक्त पदाच्या पदोन्नतीच्या प्रतीक्षेत राज्यातील शेकडो पोलिस निरीक्षक आहेत.