Ashok Chavan
Ashok Chavanesakal

SAKAL Special : चालता- बोलता! राजकारणात काही घडू शकते

Political News : गत पाच वर्षांत राज्यातील राजकारणात असलेल्या युती, आघाड्या तुटून नको त्या युती, आघाड्या झाल्या.
Published on

गत पाच वर्षांत राज्यातील राजकारणात असलेल्या युती, आघाड्या तुटून नको त्या युती, आघाड्या झाल्या. यात सत्तेसाठी निवडून आलेले पक्ष नको त्या पक्षांसोबत गेले. यातच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. या फुटलेल्या पक्षातील आमदारांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केले.

यातच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपवासी झाल्याने यांच्या तीव्र प्रतिक्रिया सर्वसामान्यांमध्ये उमटत आहे. तर झाले असे, की जिल्हा परिषदेत दोन कार्यकर्त्यांमध्ये राजकारणावर (Politics) चर्चा सुरू होती. यात काय होईल मतदारसंघात, अशी विचारणा एकाने केली. त्यावर, सध्या तरी भाजप विरुद्ध काँग्रेस सामना होईल, असे दिसत आहे.

यात कोणती जागा कोणाला जाणार, हे सांगता येत नाही. यातही निवडणुकीपर्यंत काहीही घडू शकते, असे दुसऱ्या कार्यकर्त्याने सांगितले. हल्लीच्या राजकारणात काही घडेल अन् केव्हा घडेल, असे सांगताच येत नाही. त्यामुळे काहीही होऊ शकते, असे सांगत दोघांनीही चर्चेला पूर्णविराम दिला.

(maharashtra politics SAKAL Special ashok chavan resign political satire comedy tragedy marathi news)

Ashok Chavan
SAKAL Special : चालता... बोलता...! साहेब इतका उशीर...

आई -वडिलांचे स्वप्न

प्रामाणिक अधिकारी हे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींचे रोल मॉडेल असतात. त्यांचा आदर्श घेऊन आपणही त्यांच्यासारखेच अधिकारी होऊ, असे स्वप्न हे परीक्षार्थी बघतात. असेच स्वप्न बघणाऱ्या एका मुलीचे आई -वडील एका अधिकाऱ्याच्या भेटीला येतात. मुलीचे स्वप्न ते अधिकाऱ्यांसमोर मांडतात.

पण समोरून येणारा रिप्लाय बघितल्यानंतर आई-वडिलांचा हिरमोड झाला. सत्य परिस्थिती आजच सांगितली नाही तर उद्या आपल्याला दोष देतील. त्यामुळे ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ त्यांनी करून टाकले. आता आई-वडील आपल्या मुलीला दुसरे स्वप्न साकार करायला सांगतील, हे मात्र निश्चित! (Latest Marathi News)

Ashok Chavan
SAKAL Special: चालता... बोलता! ...अन्यथा आपलं बजेट होईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com