नाशिक- शिक्षक समन्वय संघातर्फे मंगळवारी (ता.८) आणि बुधवारी (ता.९) राज्यभर शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनास नाशिक शिक्षण संस्थाचालक महामंडळाने पाठिंबा दर्शविला आहे. मविप्र संस्थेच्या प्रांगणात मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महामंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा ठराव सर्वानुमते मंजूर केला.