Women Policy
sakal
नाशिक: राज्यातील एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. ६) राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना केली. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एकल महिलांना दिलेली ही मोठी भेट मानली जात असून, त्यांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी हे धोरण तयार करण्यात येणार आहे.