जळगाव केंद्रावर २२ नोव्हेंबरपासून नाट्य स्पर्धा

जळगाव केंद्रावर २२ नोव्हेंबरपासून नाट्य स्पर्धा
Published on: 
टुडे पान २ ॲंकर लोगो : NSK26H35330 ---- रसिकांना मिळणार नाट्यप्रयोगांची मेजवानी उपशीर्षक जळगाव केंद्रावर २२ नोव्हेंबरपासून प्राथमिक फेरीला प्रारंभ सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १८ : शहरातील मुळजी जेठा महाविद्यालय परिसरातील महाकवी कालिदास सभागृहात रविवारपासून (ता.२२) ६५व्या राज्य नाट्य स्पर्धेस प्रारंभ होणार असून, दररोज सायंकाळी सातला नाटकांचे प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. जळगाव व परिसरातील नाट्यरसिकांना दिवाळीनंतर दर्जेदार नाट्यप्रयोगांची मेजवानी अनुभवता येणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरीसाठी नाट्यसंस्थांच्या तालमींना जोरदार सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राला समृद्ध नाट्यपरंपरेचा वारसा लाभला आहे. या परंपरेचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच हौशी कलाकारांना आपल्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी राज्य नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेच्या माध्यमातून विविध नाट्यसंस्थांमधील कलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि तंत्रज्ञ यांना आपली कलाकृती सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होते. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या नियोजनानुसार या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षीच्या स्पर्धेत जळगाव, नंदुरबार व इंदूर जिल्ह्यातील एकूण १५ नाट्यसंस्था प्राथमिक फेरीत सहभागी होणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत विविध विषयांवरील नाटके सादर होणार असल्याने प्रेक्षकांना वेगवेगळ्या आशयांचे आणि नाट्यशैलींचे दर्शन घडणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने सहभागी नाट्यसंस्थांमध्ये कलात्मक चुरस पाहायला मिळणार असून, कलाकारांच्या मेहनतीचा आणि सर्जनशीलतेचा अनुभव नाट्यरसिकांना घेता येणार आहे. या स्पर्धेतील नाट्यप्रयोगांना नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हौशी कलाकारांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.