
नाशिक : राष्ट्रीय अन्नसुरक्षेअंतर्गत ई-केवायसीची मुदत संपुष्टात आल्यानंतरही राज्यातील १ कोटी ४४ लाख ८९ हजार ७१५ लाभार्थींनी नोंदणी केली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थीच्या रेशनचा लाभ तूर्तास बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.