Education
sakal
नाशिक
Education News : शिक्षक भरतीचा मोठा निर्णय! शिक्षण आयुक्त कार्यालयाचे अधिकार काढून परीक्षा परिषदेकडे सुपूर्द
Government Admits Failure of Pavitra Portal : शिक्षक पदभरतीतील विलंब, तांत्रिक त्रुटी आणि प्रशासनिक अपयश मान्य करत राज्य शासनाने पवित्र पोर्टलऐवजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे भरती प्रक्रिया सोपवली.
नाशिक: राज्यातील शिक्षक पदभरतीचा रखडलेला, वेळखाऊ आणि वादग्रस्त कारभार अखेर सरकारने मान्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. सन २०१७ पासून पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेली शिक्षक भरती प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यात शिक्षण आयुक्त कार्यालय अपयशी ठरल्याची अप्रत्यक्ष कबुली देत राज्यस्तरीय शिक्षक पदभरतीचे सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे
