शिक्षकांचे मानधन आठ महिन्यांपासून रखडले!

शिक्षकांचे मानधन आठ महिन्यांपासून रखडले!
Published on: 
सेकंड मेन आठ महिण्यापासून अंशकालीन शिक्षक मानधनाच्या प्रतिक्षेत दसरा दिवाळीच्या सण उत्सवात तालुक्यातील शिक्षक अडचणीत सकाळ वृत्तसेवा नामपूर, ता. १८ : बागलाण तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत अंशकालीन कला, क्रीडा व कार्यानुभव निदेशकांचे मार्च २०२६ पासूनचे मानधन अद्याप मिळालेले नाही. तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांना आठ महिन्यांपासून मानधनाची प्रतीक्षा करावी लागत असून, वाढत्या महागाईत संसाराचा गाडा चालवायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारांतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांची पटसंख्या १०० किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा शाळांमध्ये गेल्या १४ वर्षांपासून अंशकालीन कला, क्रीडा व कार्यानुभव निदेशक कार्यरत आहेत. मात्र, दीर्घकाळ सेवा देऊनही त्यांच्या मानधनाचा प्रश्न कायम आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून शिक्षकांच्या मानधनाची मागणी वेळेत करून प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेच्या आत त्यांच्या बँक खात्यावर मानधन जमा करण्याचे आदेश असल्याचे सांगण्यात येते. असे असतानाही प्रत्यक्षात मानधन वेळेवर मिळत नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे. मानधनाची रक्कम आधीच तुटपुंजी असताना त्यातही वारंवार विलंब होत असल्याने घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि अन्य आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. निदेशकांच्या नियुक्ती व मानधनासंदर्भात न्यायालयाने यापूर्वी सकारात्मक निर्णय देऊन शासनाला आदेश दिल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. मात्र, संबंधित आदेशांची अद्याप प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याची तक्रार आहे. राज्यात सध्या ३,४३० कला, क्रीडा व कार्यानुभव निदेशक कार्यरत आहेत. या सर्व निदेशकांच्या प्रलंबित मानधनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावून मार्च २०२६ पासूनची थकीत रक्कम अदा करावी, तसेच पुढील काळात प्रत्येक महिन्याचे मानधन निर्धारित वेळेत जमा होईल, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. कोट अंशकालीन कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांचे मार्च महिन्यापासून मानधन रखडले आहे. आठ महिने उलटूनही मानधन मिळत नसल्याने शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासन व संबंधित शिक्षण विभागाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन शिक्षकांचे थकीत मानधन लवकरात लवकर अदा करावे. -संजय सावळा, क्रीडा शिक्षक पीएमश्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, नवे रातीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com