Teacher Eligibility Test
sakal
नामपूर: देशभरातील शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाने टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे सक्तीचे केल्याने यंदा टीईटी परीक्षा देणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. परीक्षेसाठी यंदा शुल्कवाढ केल्याने परीक्षा शुल्काच्या माध्यमातून सरकारने तब्बल ५० कोटी रुपयांहून अधिकचा गल्ला जमविला. गेल्या १२ वर्षांच्या कार्यकाळात नऊ वेळा टीईटी परीक्षा शिक्षण विभागाकडून घेण्यात आल्या असल्या, तरी आजही हजारो टीईटीपात्र उमेदवार नोकरीपासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.