नाशिक- राज्यस्तरीय शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीईटी) चा निकाल जाहीर करण्यात होणाऱ्या विलंबामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आणि संभ्रम निर्माण झाला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आवश्यक माहितीचा अभाव आणि निष्क्रिय प्रतिसाद यामुळे अनेक उमेदवार संतप्त झाले आहेत.