Education News : टीईटीचा निकाल जाहीर! यंदा ८.५३ टक्के उमेदवार पात्र; निकालाचा टक्का वाढला
Record Number of Candidates Appear for Maharashtra TET : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) निकाल जाहीर झाला असून, पात्र उमेदवारांच्या संख्येत यंदा लक्षणीय वाढ झाली आहे. आता आक्षेप नोंदवण्यासाठी २१ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
नामपूर: सर्वोच न्यायालयाच्या आदेशानुसार देशातील सर्व शाळांमधील शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केल्याने यंदा राज्यात सुमारे पावणेपाच लाख उमेदवारांनी परीक्षा दिल्याचा विक्रम झाला.