धुळे : टुडे पान २ साठी...
---
फोटो क्रमांक : 34903
धुळे : महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या वतीने तेली समाज भवनात झालेल्या सत्कार सोहळा व नियुक्तिपत्र वाटपप्रसंगी उपस्थित पदाधिकारी व मान्यवर.
---
कुस्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रे वितरित
महाराष्ट्र कुस्ती संघटनेची कार्यकारिणी जाहीर; पदाधिकाऱ्यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १२ : महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे नवनियुक्त कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आणि नियक्तिपत्र वाटप कार्यक्रम पेठ गल्ली क्रमांक दोन येथील तेली समाज भवनात पार पडला. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संग्राम कांबळे यांनी जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी माजी महापौर भगवान करनकाळ यांच्यावर सोपवली आहे. जिल्ह्यातील कुस्ती चळवळीला उभारी देण्यासाठी श्री. करनकाळ यांनी शहर, तालुका व जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली.
कार्यकारणीत जिल्हा उपाध्यक्षपदी गुलाब माळी, शहराध्यक्षपदी कल्याण गरुड यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच कुस्ती क्षेत्रात योगदान दिलेल्यांना उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, खजिनदार, कायदेशीर सल्लागार, ज्येष्ठ मार्गदर्शक, व्यवस्थापक आणि कुस्ती निवेदक ही पदे देण्यात आली. संजय शर्मा यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती योगेश पाटील, शिरपूरचे नगरसेवक संजय चौधरी, केतन जगताप, चेतन मंडोरे, विजू छल्लाणी, गोविंद मोरे, प्रकाश बाविस्कर, दत्तात्रय आखाडे, सुरेश येलमामे, यशवंत देवकर, धर्मराज छटलेणी, कपिल देवरे, राजेंद्र गवळी, प्रल्हाद शिंदे, गोपाल चौधरी, बंडू पाटील, माणिक गवळी, मनोज धोडके, संजय अहिरराव, केतन जाधव, पंकज नगराळे, किरण फुलपगारे, वसंत हराळ, वसंत झुंबळ, कुस्ती निवेदक गोरख पाटील, अशोक गवळी, मोहन गवळी, नाना गवळी, मनोहर मराठे, जगदीश सरोदे, सजन चौधरी, हंसराज माळी, भटू बापू चौधरी, शत्रुघ्न तावडे, विष्णू जावडेकर, शिवाजी शिरसाळे, किरण मोरे, शिवाजी बाचळकर, आनंदा सोनवणे, दत्ता शिंदे, सुधीर बडगुजर, सुरेश गवळी, रूपक बिरारी, संदीप गवळी, देवकर गवळी, छोटू थोरात, कैलास थोरात, नीलेश महाले यांच्यासह जुने वस्ताद व कुस्तीप्रेमी उपस्थित होते.