नाशिक- राज्यात दगडापासून कृत्रिम वाळू निर्मितीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यात कृत्रिम वाळू तयार करण्यासाठी ५० क्रशरला परवानगी देतानाच राज्यात दीड हजार क्रशर सुरू करण्यात येतील. या माध्यमातून तीन वर्षांत बांधकामासाठी नैसर्गिक वाळूची गरज भासणार नाही, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. राज्यात यापुढे डोंगर व टेकड्यांवर खोदकामाला परवानगी दिली जाणार नाही, अशी घोषणाही त्यांनी केली.