नाशिक- राष्ट्रवादी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी (ता.२०) मंत्रिपदाची शपथ घेतली. श्री. भुजबळ यांच्या राज्य मंत्रिमंडळातील ‘एन्ट्री’मुळे पालकमंत्रिपदासाठी आणखी एक स्पर्धक वाढल्याने चुरस निर्माण झाली. या पदावर आता कोणाची वर्णी लागते, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. दुसरीकडे या पदावर दावा सांगणाऱ्या महायुतीतील राष्ट्रवादीही यानिमित्त उडी घेणार, हे आता जवळपास निश्चित मानले जाते.