Nashik News : नाशिकमध्ये २२ जूनपासून भाकपचे राज्य अधिवेशन; मोटारसायकल रॅलीने होणार शुभारंभ
Inaugural Rally and Procession Details : भाकप राज्य अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी नाशिकमध्ये काढण्यात येणाऱ्या भव्य वाहन रॅलीची तयारी करताना कार्यकर्ते; उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रीय नेत्यांची उपस्थिती राहणार
नाशिक- भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे २५ वे अधिवेशन २२ ते २४ जून या कालावधीत नाशिक येथे होणार आहे. बोधलेनगर परिसरातील श्रीकृष्ण लॉन्स येथे हे अधिवेशन आयोजित करण्यात आले असून, उद्घाटन समारंभ सकाळी १० वाजता वाहन रॅलीने होणार आहे.