नाशिक- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (ता. ८) नाशिकमधील राजकीय नेत्यांच्या मुला-मुलींच्या विवाह सोहळ्यास हजेरी लावत ‘वेडिंग डिप्लोमसी’ साधली. यात शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते, माजी आमदार नरेंद्र दराडे व माजी नगरसेवक दीपक दातीर यांच्याकडे उपस्थिती दर्शवली. तर जाता जाता शिवसेना (उबाठा) पक्षाचे शहराध्यक्ष विलास शिंदे यांची पुन्हा भेट घेतली.