अभोणा- देशासाठी जिवाची पर्वा न करता रणभूमीवर शौर्य गाजवणारा गोसराणेचा वीरपुत्र भूषण मोरे आज आपल्या मायभूमीत परतला, आणि संपूर्ण गाव आनंदाश्रूंनी न्हालं! पुलवामातील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या निर्णायक मोहिमेत भूषण मोरे यांनी अत्यंत धैर्याने सहभाग घेत, शत्रूला सडेतोड उत्तर दिले.