इगतपुरी शहर - टिटोली येथे येथे ११ मेस किरकोळ भांडणातून २५ वर्षीय तरुणाच्या छातीत चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. या खुनाच्या घटनेतील सहा संशयित आरोपींना पकडण्यात इगतपुरी पोलिसांना यश आले असून, या सर्व संशयितांना इगतपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली, तर एकाला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.