मालेगाव- बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलिस अधिक्षक तेगबीरसिंह संधू व सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. या पथकांतर्गत शहर व इतर ठिकाणी गोवंश जप्तीच्या कारवाया सुरु आहेत. आतापर्यंत पोलिसांनी ५ ते ६ ठिकाणी कारवायात २० हून आधीक जनावरे जप्त केली. यात पवारवाडी, किल्ला, तालुका, वडनेर खाकुर्डी या पोलिसांनी कारवाया केल्या.