नामपूर- हिंदू धर्म संस्कृतीत कुठल्याही व्यक्तीच्या निधनानंतर त्याला मोक्ष मिळण्यासाठी विधिवत पद्धतीने नदीपात्रात अस्थी विसर्जन करण्याची पूर्वापार प्रथा आहे. परंतु येथील साक्री रस्त्यालगत असणाऱ्या स्मशानभूमीत चोरट्यांनी मृत महिलेच्या चितेच्या राखेसह अस्थी चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आल्याने येथील स्माशानभूमी चर्चेचा विषय बनली आहे.