नाशिक- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी झालेल्या सुधाकर बडगुजर आणि महाविकास आघाडीचे माजी नगरसेवक गणेश गिते यांच्या प्रस्तावित भाजप प्रवेशाला नाशिकमधील स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचा जोरदार विरोध सुरू होता. याच पार्श्वभूमीवर शहरातील शिष्टमंडळाने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीत महाजनांनी स्पष्ट शब्दांत नाराज कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्यानंतर शिष्टमंडळाने आपली नाराजी मागे घेतली आणि नाशिककडे माघारी वळले.