मालेगाव- भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेले चुकीच्या, अपमानजनक वक्तव्यामुळे त्यांच्याविरोधात शेतकरी द्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी मोसम चौकातील महात्मा गांधी पुतळा येथे एकत्र आले. लोणीकरांचा जोरदार निषेध करीत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांना निवेदन दिल्यावर केली.