Sharad Ponkshe : कर्करोगावर मात केलेल्या शरद पोंक्षे यांची नामको रुग्णालयात प्रेरणादायी भेट
Sharad Ponkshe Visits Namco Hospital to Inspire Patients : नामको रुग्णालयात रुग्णांशी संवाद साधताना ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे; त्यांच्या अनुभवातून दिलासा व प्रेरणा मिळाल्याचे रुग्णांनी सांगितले.
नाशिक- आजार झाला आहे, हे जर मान्यच केले नाही, तर शरीर उपचारांना कसा प्रतिसाद देणार? आजार स्वीकारणे हेच पहिले पाऊल आहे, बरे होण्याच्या दिशेने, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी आपल्या अनुभवातून रुग्णांना दिलासा दिला.