शिरपूर : महर्षी वाल्मिक ऋषी जयंती बातमी

शिरपूर : महर्षी वाल्मिक ऋषी जयंती बातमी
Published on: 
SHC26B13552 शिरपूर : महर्षी वाल्मिक ऋषींना अभिवादन करताना पदाधिकारी. ------- महर्षी वाल्मीकींना शिरपूरला अभिवादन शिरपूर, ता. ३० : येथील महर्षी वाल्मीकी ऋषी उत्सव समितीतर्फे रामायणकार आद्यकवी महर्षी वाल्मीकींची जयंती विविध उपक्रम व कार्यक्रमांद्वारे साजरी करण्यात आली. दुचाकी रॅलीसह मिरवणुकीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. जयंतीच्या पूर्वसंध्येला २५ ऑक्टोबरला वाल्मिक नगर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर वाल्मिक नगरमध्ये उभारलेल्या महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. २६ ऑक्टोबरला सकाळी कोळीवाडा येथील महर्षी वाल्मीकी सर्कलपासून दुचाकी रॅली काढण्यात आली. शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन रॅली नेऊन सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले. सायंकाळी महर्षी वाल्मिकी ऋषींच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून ढोल- ताशे, बँडच्या गजरात महर्षी वाल्मीकी ऋषींच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. आमदार काशीराम पावरा, नगर परिषदेचे गटनेते भूपेशभाई पटेल, ग. स. बँकेचे गटनेते निशांत रंधे, माजी उपनगराध्यक्ष राजगोपाल भंडारी, जि. प. चे माजी अध्यक्ष देवेंद्र पाटील, उपनगराध्यक्षा संगीता देवरे, बाजार समितीचे संचालक प्रसाद पाटील, नगरसेवक दीपक माळी, वासुदेव देवरे, गणेश सावळे, भालेराव माळी, रवींद्र माळी, कोळी समाजाचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, राजेंद्र गिरासे, दीपक जमादार, धीरज राजपूत, कन्हैया चौधरी, कल्पेश राजपूत उपस्थित होते. संदीप सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. उत्सव समितीचे अध्यक्ष दिनेश कोळी, कार्याध्यक्ष राहुल कोळी, उपाध्यक्ष समाधान कोळी, जगदीश कोळी, सचिव धर्मेंद्र कोळी, कोशाध्यक्ष ईश्वर कोळी, सहकोशाध्यक्ष गणेश कोळी, सहसचिव रोहि कोळी, शेखर कोळी, राहुल सुरेश कोळी, वाल्मिक देविदास कोळी व पदाधिकाऱ्यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.