महर्षी वाल्मीक जन्मोत्सव

महर्षी वाल्मीक जन्मोत्सव
Published on: 
फोटो : H33815 नाशिक रोड : महर्षी वाल्मीक जन्मोत्सव कार्यक्रमप्रसंगी उपस्थित मान्यवर महर्षी वाल्मीक जन्मोत्सव नाशिक रोड येथे उत्साहात नाशिक रोड, ता. २८ : येथील अखिल भारतीय महर्षी वाल्मीक नवयुवक संघातर्फे वाल्मीक जयंती उत्साहात साजरी झाली. या वेळी शिवसेना (उबाठा) पक्षाचे मनपा गटनेते केशव पोरजे, नाशिक रोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील मगर, श्याम खोले नगरसेवक कैलास मुदलियार यांच्या हस्ते आरती झाली. जयंतीनिमित्त विविध भागातून सहा चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले. सहभागी झालेल्या चित्ररथाला नीलेश राठोड यांच्या हस्ते प्रसाद वाटप करण्यात आला. याप्रसंगी अखिल भारतीय वाल्मीकि नवयुवक संघाचे प्रदीप बहनवाल, लक्ष्मण ढकोलीया यांनी मार्गदर्शन केले तसेच. प्रमुख पाहुणे म्हणून महेशकुमार ढकोलीया, कैलास मुदलीयार, श्याम खोले, कोमल मेहरोलीया, राजेंद्र बागडे, सुरेंद्र मेहरोलीया, संतोष वाघ, योगेश गाडेकर, संजय राठोड, नाशिक रोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे माजी अध्यक्ष विजय सोनार, महेश कुलथे, अनिल कुलथे, उल्हास कुलथे, संदीप परसे उपस्थित होते. आयोजक प्रदीप बहनवाल, राकेश बहनवाल, मुकेश राठोड, नीलेश राठोड, राजेश वाल्मीकि, अशोक बहनवाल, कुमार बहनवाल, आनंद राठोड, नीरज वाल्मीकि, दीपक ढकोलीया, प्रदीप चिडियाले, विकास राठोड, गोलू ढकोलीया यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com