फोटो : B05036
डीजीपीनगर : सभेला संबोधित करताना संस्थेचे अध्यक्ष भाऊराव बच्छाव. व्यासपीठावर उपस्थित संस्था पदाधिकारी व संचालक.
--
महात्मा फुले संस्थेची
वार्षिक सभा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
डीजीपीनगर, ता. २६ : पखाल रोडवरील महात्मा फुले समाज शिक्षण संस्थेची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भाऊराव बच्छाव होते.
या वेळी कार्याध्यक्ष डी. डी. खैरनार, सरचिटणीस पुरुषोत्तम फुलसुंदर, चिटणीस सुनीता खैरनार, खजिनदार बाळासाहेब पुंड, शिक्षणाधिकारी मधुकर बच्छाव उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. विषय पत्रिकेप्रमाणे कामकाजाची सुरुवात झाली. सभेचे वार्षिक इतिवृत्त, संस्थेचा वार्षिक अहवाल, एकत्रित खर्च उत्पन्न पत्रक, ताळेबंद पत्रक, अंदाजपत्रक व संस्थेच्या वाढ विकासासाठी करावयाचे प्रयत्न देणगी व निधी जमा करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना हे सर्व विषय बहुमताने मंजूर करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष भाऊराव बच्छाव यांनी संस्थेच्या वाढ व विकासासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज आहे. आपली संस्था समाजासाठी भूषणावह आहे. त्यामुळे संस्था वाढीसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या मान्यवरांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सभेचे सूत्रसंचालन संचालक सुधाकर जाधव यांनी केले. आभार संचालक माधवराव मोरे यांनी मांडले. या वेळी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.