समता परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त पाणी बचतीचा जागर! येवल्यात फुले दांपत्यांच्या पुतळ्याला अभिवादन करत विचारांचे स्मरण

समता परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त पाणी बचतीचा जागर! येवल्यात फुले दांपत्यांच्या पुतळ्याला अभिवादन करत विचारांचे स्मरण
Published on: 
कृपया आवश्यक... पान-३ मेन फोटो-27381 येवला : समता परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त येथे फुले दांपत्याच्या प्रतिमेला अभिवादन करताना पदाधिकारी व कार्यकर्ते. समता परिषदेच्या स्थापनादनी पाणीबचतीचा जागर येवल्यात फुले दांपत्यांच्या पुतळ्याला अभिवादन करत विचारांचे स्मरण सकाळ वृत्तसेवा येवला, ता. १ : दुष्काळाच्या झळांनी पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचा संदेश देत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा ३४ वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. येथील महात्मा फुले नाट्यगृहात क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ....... या वेळी सामाजिक समतेच्या विचारांसोबतच पाणीबचतीच्या जनजागृतीचा संकल्पही व्यक्त करण्यात आला. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना १ नोव्हेंबर १९९२ ला झाली. स्थापना दिनानिमित्त महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या समता, शिक्षण व सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याबरोबरच समाजप्रबोधनाची चळवळ अधिक बळकट करण्याचा निर्धार या वेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी पाणीबचतीच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली. पाणी ही अमूल्य नैसर्गिक संपत्ती असून, तिचे संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि येवला नगर परिषद राबवीत असलेल्या पाणीबचतीच्या उपाययोजनांना सहकार्य करावे, असे आवाहन परिषदेचे शहराध्यक्ष भूषण लाघवे यांनी केले. महात्मा फुले यांनी दिलेल्या समता, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा जागर करण्यासोबतच वर्तमानातील सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, दत्ता निकम, नगरसेवक गोटूभाऊ मांजरे, उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे, सुमित थोरात, सचिन सोनवणे, सुहास भांबारे, बबलूभाई शेख, राकेश कुंभारे, समाधान पगारे, बापू जगदाळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.