फटाक्यांची आतषबाजी,ढोल ताशांच्या गजरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष! येवला : बॅलेटवरील निवडणुकांत महाविकास आघाडीच विजयी : शाहूराजे शिंदे

फटाक्यांची आतषबाजी,ढोल ताशांच्या गजरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष! येवला : बॅलेटवरील निवडणुकांत महाविकास आघाडीच विजयी  : शाहूराजे शिंदे
Published on: 
पान-३ मेन फोटो-27363 येवला : महाविकास आघाडीच्या विजयाचा जल्लोष करताना राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते. ढोल-ताशांच्या गजरात महाविकास आघाडीचा जल्लोष! येवला : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आनंदोत्सव; जोरदार घोषणाबाजी सकाळ वृत्तसेवा येवला, ता. २९ : विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने पाचपैकी तीन जागांवर विजय मिळविल्याच्या आनंदात येथे आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विंचूर चौफुली येथे जल्लोष केला. ढोल-ताशांच्या गजरात आणि आतषबाजीत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. पाच ठिकाणी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने एक, तर राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार) दोन जागांवर विजय मिळविला. या यशानिमित्त महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते विंचूर चौफुली येथे एकत्र आले होते. यावेळी विजयाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक विभागाचे जिल्हाध्यक्ष शाहूराजे शिंदे यांनी निवडणूक निकालावर भूमिका मांडत पदवीधर मतदारसंघातील तीनही जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळविल्याने पदवीधर मतदारांचा कौल आघाडीच्या बाजूने असल्याचे स्पष्ट होते. तसेच, बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यास महाविकास आघाडीच विजयी होते, असे सांगितले. युवक जिल्हाध्यक्ष शाहूराजे शिंदे, विधानसभा अध्यक्ष सुभाष निकम, विधानसभा कार्यकारी अध्यक्ष अजिज शेख, तालुकाध्यक्ष विठ्ठलराव शेलार, शहराध्यक्ष योगेश सोनवणे, युवक तालुकाध्यक्ष किरण ठाकरे, सागर पडवळ, नगरसेवक इकलाक शेख, काका वाणी, पंकज माळी, नारायण मोरे, सुभाष गायकवाड, अन्सार शेख, इमरान शेख, दीपक लाठे, वाल्मीक सोपे, सचिन कड, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नानासाहेब शिंदे, तात्यासाहेब लहरे, संदीप दारुंटे, प्रीतम पटणी, शिवसेनेचे संतोष गोरे, अमित अनकाईकर, भीमशक्तीचे विजय घोडेराव, श्री. खळे आदी उपस्थित होते. ............ पदवीधर मतदारसंघातील तीनही जागांवर महाविकास आघाडीने मिळविलेला विजय हा मतदारांचा आघाडीवरील विश्वास दर्शविणारा आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यास महाविकास आघाडीच विजयी होते, हे या निकालातून पुन्हा एकदा समोर आले आहे. -शाहूराजे शिंदे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.