सन्मान सौदामिनींचा उपक्रम

सन्मान सौदामिनींचा उपक्रम
Published on: 
धुळे : टुडे पान २ साठी.. -- फोटो क्रमांक : 32997 धुळे : महावितरणच्या सन्मान सौदामिनींचा कार्यक्रमात फेटे परिधान करून सहभागी झालेल्या महिला अधिकारी व कर्मचारी. -- महावितरणच्या महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान -- धुळ्यात सन्मान सौदामिनींचा उपक्रम; जनजागृती रॅली उत्साहात सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १९ : महावितरणच्या धुळे मंडळाच्या वतीने सन्मान सौदामिनींचा उपक्रमांतर्गत महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फेटे बांधून आणि गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. तांत्रिक व अत्यावश्यक सेवेत महिला उत्कृष्ट कामगिरी बजावत असून, त्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार याप्रसंगी अधीक्षक अभियंता संजय सरग यांनी काढले. कार्यालयीन कामकाजाचा भार सांभाळत महिलांनी कठीण प्रसंगांवर मात करत यशस्वी कारकीर्द घडवली आहे. या उपक्रमामुळे त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त होऊन काम करण्याची नवी ऊर्जा निर्माण झाली असल्याचे श्री. सरग यांनी नमूद केले. या सोहळ्यात महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले अनुभव कथन केले. या कार्यक्रमासोबतच सेवा संकल्प अभियानांतर्गत महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलर (स्मार्ट) योजना, स्मार्ट मीटरचे फायदे, वीज बचत, वीज सुरक्षा, कॅपॅसिटर बसविणे आणि विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन याबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. कोकण प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, अधीक्षक अभियंता सरग, कार्यकारी अभियंते, विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com