नाशिक- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत रणनीती आखली. महायुतीसंदर्भात निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. परंतु स्वतंत्र लढण्याचा विचार झाल्यास महायुतीला सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार रविवारी (ता. २०) राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या बैठकीत केला.