माहेश्`वरी महिला मंडळ

माहेश्`वरी महिला मंडळ
Published on: 
टुडे पान ३ : मेन फिचर --- लोगो : आम्ही साऱ्याजणी सामाजिक क्षेत्र -------- NSK26H32041 जळगाव : माहेश्वरी महिला संघटनेच्या पदाधिकारी ------ एकजुटीतून समाजोन्नतीसह एकत्र कुटुंबव्यवस्थेला प्रोत्साहन माहेश्वरी महिला संघटनेचे राष्ट्रहितासाठी कार्य; युवक-युवतींना रोजगाार प्रशिक्षणासह संस्कार सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १२ : माहेश्र्वरी समाजात विभक्त कुटुंब पद्धतीचा बिमोड करून एकत्र कुटुंब राहण्यासाठी समाजाला मार्गदर्शन करणे, युवक, युवतींना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणे, स्वरक्षणासाठी शौर्य प्रशिक्षण देणे, जेन अल्फा’ पिढीला नवीन दिशा देणे, समाजातील गरजूंना मदत करून समाजाचा उत्कर्ष कसा होईल, यासाठी नेहमी कार्यरत असल्याच्या भावना ‘जळगाव जिल्हा माहेश्वरी महिला संघटन व जळगाव शहर एवंम तहसील माहेश्र्वरी महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘सकाळ’च्या आम्ही साऱ्याजणी’ या उपक्रमांतर्गत व्यक्त केल्या. स्वतंत्र महिलांची टीम कार्यरत मनीषा तोतला (जिल्हा कोषाध्यक्ष) : जिल्हा संघटनेत ३५० ते ४००, तर तहसील संघटनेत १५० ते २०० सदस्य आहेत. प्रत्येक समितीसाठी स्वतंत्र महिला टीम असून, त्यांच्यामार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. संघटनेचे कार्य ठराविक प्रोटोकॉल व नियोजनानुसार चालते. तहसील, जिल्हा, प्रांत आणि राष्ट्र संघटना अशा सुसूत्र साखळीतून सर्व स्तरांवर समन्वय, शिस्त व एकसंधता राखली जाते. समितीच्या उद्दिष्टांनुसार उपक्रम श्रीकांता मणियार (कार्याध्यक्ष, जळगाव तहसील संघटना) : शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि सामाजिक जबाबदारीविषयी जागरूकता निर्माण केली जाते. प्रत्येक समितीची स्वतंत्र महिला कार्यकारिणी असून, तिच्यामार्फत उद्दिष्टांनुसार विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. राष्ट्रहिताचे कार्य अरुणा मंत्री (अध्यक्ष, शहर-तहसील) : माहेश्वरी समाज महिला मंडळ समाजाच्या हितासाठी विविध दहा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांच्या माध्यमातून कार्य चालते. लहान मुलांवर संस्कार करण्यापासून युवकांना रोजगाराचे प्रशिक्षणापर्यंत सर्व उपक्रम राबविले जातात. वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, पर्यावरण संरक्षण, ग्रामविकास आणि नागरिकांमध्ये सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्यांची जाणीव निर्माण केली जाते. महिलांना स्वसंरक्षाचे धडे चंचल तापडिया (जिल्हा सचिव) : मुली, महिलांना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण दिले जाते. यात ८५ मुली, महिलांनी सहभाग घेतला असून, त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण झाला. त्याचबरोबर अनेक शााळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली आहे. धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे युवक, युवतींचे व्यक्तिमत्त्व उंचावण्यासाठी कार्य केले आहे. ‘जहा भक्ती है वहा शक्ती है, जहा सेवा है वहा संस्कार है, एकता के सूत्र में बांधकर हमारा संघटन समाज में प्रेम, सहयोग, सदभावना का दीप जलता है, या ओळींना अनुसरून संघटनेचे कार्य सुरू आहे. कौटुंबिक व सामाजिक समन्वय राणी लाहोटी (सचिव, शहर-तहसील) : संघटनेच्या माध्यमातून संस्कृती, संस्कार, भारतीय परंपरा, सण-उत्सव आणि आध्यात्मिक मूल्यांचे जतन केले जाते. कौटुंबिक एकोपा वाढविण्यासह समाजातील परस्पर सहकार्य दृढ केले जाते. समाजसेवा, महिला सक्षमीकरण आणि राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी मंडळाची तीन वर्षांसाठी नियुक्ती होते. या कालावधीत विविध प्रकारचे सुमारे ३०० उपक्रम राबविले जातात. --- गरजूंना शैक्षणिक सुविधा सीमा धूत (संघटनमंत्री, शहर-तहसील) : संघटनेचे कार्य ठराविक कार्यपद्धती व शिस्तीनुसार चालते. तहसील, जिल्हा, प्रांत आणि राष्ट्र संघटना अशा साखळीतून सर्व स्तर जोडलेले आहेत. माहेश्वरी महिला संघटना ही केवळ महिलांची संघटना नसून, समाजहित व राष्ट्रहितासाठी कार्यरत आहे. गरजूंना मदत करणे, शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि विविध सामाजिक उपक्रम राबविणे, यावर भर दिला जातो. ----- गरीब, गरजूंना मदत उषा कासट (जिल्हाध्यक्ष) : माहेश्वरी समाजासह इतर समाजांतील गरजूंनाही संघटनेतर्फे मदत केली जाते. आतापर्यंत पाच युवतींचे कन्यादान करून त्यांना संसारोपयोगी वस्तू दिल्या आहेत. विवाह समितीने सहा विवाह जुळविले असून, ४० विधवा महिलांना मदत केली आहे. तसेच, २० जणांना अल्पदरात वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी संघटनेने प्रयत्न केले आहेत. --------- चिमुरड्यांना बचतीची सवय सुमती नवाल (जिल्हा सल्लागार) : बालिका व युवतींमध्ये बचतीची सवय लागावी, यासाठी लवकरच ‘पिगी बँक’ उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. १५१ कन्या भोजन कार्यक्रमातून बचतीचे महत्त्व पटवून दिले जाईल. ४५० ते ५०० बालिकांना पिगी बँक कीट वाटप करण्यात येणार आहेत. महिलांचे स्वावलंबन, नेतृत्वगुण, सरकारी योजनांची माहिती तसेच बालकांमध्ये संस्कार, नैतिक मूल्ये व आत्मविश्वास वाढविण्यावर भर दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com