Maharashtra industrial investment job creation
esakal
नाशिक : महिंद्र आणि महिंद्रच्या विस्तारित प्रकल्पासाठी नाशिकमध्येच जागा देण्यात येणार असून, हा प्रकल्प येथे साकारला (Mahindra Nashik Expansion Project) जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्ह्यात एकूण ३०१ सामंजस्य करार करण्यात आले असून, त्यामध्ये १३ हजार १८९ कोटी ८८ लाखांची गुंतवणूक आणि ३२ हजार ४८७ रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे.