Video : मोदी-शाह नव्हे,'यांच्या'मुळे झालो मुख्यमंत्री; CM शिंदेंचा चर्चेला पूर्णविराम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

Video : मोदी-शाह नव्हे,'यांच्या'मुळे झालो मुख्यमंत्री; CM शिंदेंचा चर्चेला पूर्णविराम

Eknath Shinde News : मविआ सरकारविरोधात बंड पुकारात राजकीय भूकंप करणाऱ्या एकनाथ शिंदेंनी राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाची युती होऊन, राज्यात शिंदे-फडणवीसांचे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्रीपदाची माळ शिंदेंच्या गळ्यात पडण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हात असल्याची चर्चा होती. मात्र, आज स्वतः शिंदेंनी मुख्यमंत्री होण्यामागे कुणाचा आशीर्वाद आहे याचा खुलासा केला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.

शिंदे म्हणाले की, राज्याचा मुख्यमंत्री होण्यामागे आपल्यावर स्वामी नारायणजींचा आशीर्वाद असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे सत्तांतरानंतर शिंदेंना मुख्यमंत्री करण्यामागे मोदी शाहांचा हात असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. नाशिकमध्ये स्वामी नारायण मंदिराच्या उद्घटन प्रसंगी ते बोलत होते.

हेही वाचा: BJP : पंकजा मुंडेंच्या विधानाने भाजपात नाराजी; मुनगंटीवारांकडून मात्र पाठराखण

यावेळी शिंदेंनी एक जुनी आठवण सांगितली. ते म्हणाले की, मी 11/11/2017 मध्ये येथे आलो होतो. त्यावेळी शिलान्यास भूमीपूजन झाले होते. त्यानंतर आज याच ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून उद्घाटन करण्याची संधी मिळाली आहे. हे माझं भाग्य असून, मी मुख्यमंत्री झालो, हा स्वामी नारायणजींचा आशीर्वाद आहे. त्यामुळे मी सर्व लोकांना धन्यवाद देऊ इच्छितो असे शिंदेंनी म्हटले आहे.