Nashik News: प्रवेशद्वारावरील मुख्य रस्ता दोऱ्या लावत बंद! बाजार समितीतील दुकानदारांचे आंदोलन

After closing the entrance of the bazaar committee, all the shopkeepers came together and roped the closed shops.
After closing the entrance of the bazaar committee, all the shopkeepers came together and roped the closed shops.esakal

Nashik News : दिंडोरी रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी, व्यापारी, कर्मचारी, हमाल आणि ग्राहकांना जाण्यासाठी पूर्वी दिंडोरी रोड, पेठ रोड व इंद्रकुंडाच्या बाजूने अशी तीन प्रवेशद्वारे होती.

मात्र, गेल्या १२-१५ दिवसांपासून बाजार समितीने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय इंद्रकुंडाकडील पेठ रोड ते निमाणीदरम्यानचे प्रवेशद्वार कुलूपबंद केल्याने शेतकरी, व्यापारी वर्गासह येथील व्यावसायिकांची अडचण झाली आहे. (main road at entrance cordoned off Movement of shopkeepers in market committee Nashik News)

काही दिवसांपूर्वी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे बाजार समितीच्या कार्यालयात याच प्रवेशद्वाराने येत असताना रस्त्यात उभ्या केलेल्या वाहनांमुळे झालेल्या वाहतूक कोंडीत पिंगळेंसह काही शेतकऱ्यांची वाहने अडकली होती.

त्यामुळेच या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. मात्र या प्रवेशद्वाराजवळील अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद झाला आहे. तसेच, या ठिकाणी येणारे ग्राहक रस्त्यावर गाडी लावत असल्याने बाजार समितीत येताना मोठ्या प्रमाणात अडचण होते.

यामुळे रस्ता बंद केल्याचे दुकानदारांना बाजार समितीतून सांगण्यात आले. यावर उपाय म्हणून सर्व दुकानदारांनी एकत्र येत प्रवेशद्वारालगत असणारी सर्व दुकाने काही काळ बंद ठेवून ज्या दुकानदारांनी अतिक्रमण केलेले होते ते सर्व अतिक्रमण काढून घेण्यात आले आहे.

तर काही दुकानदार अतिक्रमण काढत नसल्याने व इंद्रकुंडाच्या बाजूने या दुकानात ग्राहक येत असल्याने सर्व दुकानदारांनी मिळून पुढील बाजूने दोऱ्या बांधून रस्ता बंद केला होता. यानंतर अतिक्रमण बाकी असलेल्या दुकानदाराने तेथील अतिक्रमण काढून घेतले असून, रस्ता मोकळा करण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

After closing the entrance of the bazaar committee, all the shopkeepers came together and roped the closed shops.
Nashik News: मुख्यालयासह पंचायत समितीस्तरावर अधिकारी; शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी फिल्डवर

निवेदनाचा आशय असा : अतिक्रमणाचा त्रास बाजार समितीत येण्या-जाण्यासाठी होत आहे ते सर्व अतिक्रमण काढून घेण्यात आले आहे. तसेच, यापुढे खबरदारी म्हणून बाजार समितीत जाण्या-येण्याचा रस्ता व्यवस्थितपणे शेतकऱ्याला आत मोकळा व व्यवस्थित राहील याची काळजी घेऊ व आलेल्या मालाच्या गाड्या गर्दी नसताना खाली करू व आलेल्या ग्राहकाला गाडी व्यवस्थित पार्क करून जाण्या-येण्याचा मार्ग कसा सुरळीत राहील,

यावर लक्ष देऊ व नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला योग्य ते सहकार्य करू, असे दुकानदारांनी बाजार समितीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवृत्ती महाले, कैलास चव्हाण, उत्तम बोडके, सागर बोडके, नीलेश पाटील, नीलेश आहेर, तन्मय पिंगळे, अविनाश मानकर, पप्पू रहाणे, बबलू वाणी आदी दुकानदार उपस्थित होते.

After closing the entrance of the bazaar committee, all the shopkeepers came together and roped the closed shops.
Nashik News: तहसीलदार राजश्री गांगुर्डेंना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com