लासलगाव- मेमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे यंदा मक्याच्या पिकासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. सोयाबीनच्या तुलनेत मक्याचा उत्पादन खर्च कमी येतो. तसेच गेल्या वर्षी सोयाबीनच्या दरात झालेली घसरण आणि उत्पादनात घट झाल्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात मक्याच्या पेरण्यांवर भर दिला आहे.